अखेर नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या प्रयत्नांनी कोपरखैरणे येथील पाणीपुरवठा कामगारांना १४ महिन्यांची थकबाकी मिळाली
नवी मुंबई, दि. १५: नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना २७ महिन्याची वेतनवाढ थकबाकी सह देण्यात आली. परंतु कोपरखैरणे येथील पाणीपुरवठा विभागातील कामगारांना मात्र १४ महिन्याची थकबाकी मिळाली नव्हती. यासाठी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे ऍड. सुरेश ठाकुर यांनी आयुक्त तथा संबधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवल्यामुळे कोपरखैरणे येथील पाणीपुरवठा कामगारांना अत्यानंद झाला असुन सर्व कामगारांनी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे आभार मानले आहेत. तसेच सुरेश ठाकुर यांना मनापासुन धन्यवाद दिले. याकामी कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी विशेष मेहनत घेऊन कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे कामगारांनी संजय देसाई यांचे आभार व्यक्त करुन धन्यवाद दिले. तसेच पाणीपुरवठा कामगार प्रमुख नरेंद्र वैराळ, बाळकृष्ण खोपडे, जगदीश म्हात्रे, यशवंत काळे, कौसल्या ताई चव्हाण, गजानन अंबारे आणि इतरांचेही आभार व्यक्त केले आहेत.
