कृषि विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ चा शिक्का असणार नाही; कृषिमंत्र्यांनी घेतली दखल
अमरावती: कृषि विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा शिक्का असणार नाही, असं कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे. अमरावतीच्या श्री शिवाजी फलोत्पादन महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख करण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल कृषिमंत्र्यांनी घेतली आहे.
शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेला दिले असल्याचं भुसे यांनी सांगितलं.
