….या कारणासाठी मनसे नेते अमित ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई दि.२२ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी निवासी डॉक्टर व आशा सेविकांच्या मागण्यांसंदर्भात आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते.
या भेटी दरम्यान त्यांनी निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षा, ७२ हजार आशा सेविकांना किमान १०,००० रु. मानधन तसंच इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत राज्यपालांना निवेदन सादर करून चर्चा केली. गेल्या काही काळापासून अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपले काका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही काही विषयांबाबत लक्ष वेधून घेतले होते.
