कोरोना Update: पनवेल मनपा हद्दीत एकाच दिवशी आढळले रेकॉर्ड ब्रेक रुग्ण
पनवेल: पनवेल महानगरपालीका हद्दीत आज दि. ७ मे २०२० रोजी एकूण नव्या ६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यातील बहुसंख्य रुग्ण कामोठे, पनवेल विभागातील आहेत. सर्वच रुग्णांना त्यांच्या निकटच्या लोकांकडून अथवा कामाच्या ठिकाणी कोरोना बाधितांकडून संसर्ग झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
आजची रुग्णसंख्येतील झालेली वाढ ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात मोठी वाढ आहे. ज्यामुळे पनवेलकारांच्या चिंतेत नक्कीच वाढ झाली आहे. आजच्या आकडेवारीला धरून पनवेल महापालिका विभागात एकूण ८७ रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत ४१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले आहेत तर २ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
Press Note of Date 07/05/2020 pic.twitter.com/UE6lSgirOK
— Panvel Municipal Corporation (@PanvelCorp) May 7, 2020
