ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: खावटी अनुदान योजनेंतर्गत आदिवासी कुटुंबांना मिळणार ३ हजार रुपयांची मदत
मुंबई: आदिवासी विकास विभागानं काल महाराष्ट्र दिनानिमित्त खावटी अनुदान योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी तीन हजार रुपये मदत केली जाणार आहे. दीड हजार रुपये मनी ऑर्डरने तर दीड हजार रुपयाचा जीवनावश्यक वस्तू रूपात मदत दिली जाणार आहे. टाळेबंदीच्या काळात आदिवासींची अर्थार्जनाची अडचण लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागानं ही योजना आखली आहे. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी या योजनेबद्दल माहिती दिली. राज्यातल्या मनरेगा कामावरची आदिवासी कुटुंबं, पारधी कुटुंबं तसेच जिल्हाधिकाऱ्यानी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंब यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं पाडवी यांनी सांगितलं.
Source – AIR
