कपिल वाधवान,धीरज वाधवान यांना न्यायालयाचा दणका; सीबाआय कोठडी ८ तारखेपर्यंत वाढली
येस बँक प्रकरणी DHFL चा प्रवर्तक कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज वाधवान यांची सीबीआय कोठडी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं येत्या ८ तारखेपर्यंत वाढवली आहे. सीबीआयनं आज न्यायालयापुढं तशी मागणी केली, ती न्यायालयानं मान्य केली.
Source – AIR
