केंद्रीय शिक्षण मंडळ प्रायोगिक तत्वावर निवडक शाळांमध्ये ओपन-बुक टेस्ट पद्धत राबवणार
मुंबई/नवी दिल्ली, दि. 23: केंद्रीय शिक्षण मंडळ प्रायोगिक तत्वावर निवडक शाळांमध्ये ओपन-बुक टेस्ट पद्धत राबवणार आहे. इयत्ता ९ वी आणि १० वी साठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि इयत्ता ११ वी आणि १२वी साठी इंग्रजी, गणित, जीवशास्त्र या विषयांच्या मूल्यांकनाचं उद्दिष्ट आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या चाचण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला वेळ मोजला जाणार असून त्यावर अभिप्राय घेतले जातील. ही योजना राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरणात केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नियामक मंडळाच्या बैठकीत ही कल्पना मांडण्यात आली होती.