येत्या ३० ऑगस्टला पंतप्रधान करणार ‘मन की बात’; अनलॉक बाबत होणार नवी घोषणा?
नवी दिल्ली, दि.१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० ऑगस्टला मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. मन की बातचा हा ६८ वा भाग असेल.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी अनलॉक संदर्भात काही नवीन घोषणा करतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी नमो अॅप किंवा माय जीओव्हीवर अथवा १९२२ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपल्या सुचना पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Source – AIR
