सासूने दिला सुनेला तब्बल ३०० कोटींचा हार भेट
मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उदयोजक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह ९ मार्च २०१९ रोजी पार पडला आहे. काही दिवसांपूर्वी श्लोकाच्या ‘मुंह दिखाई’चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सासू नीता अंबानी यांनी आपल्या लाडक्या सुनेला भेट म्हणून एक हिऱ्याचा हार दिलाय. या हारची किंमत तब्बल ३०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. श्लोकाला भेट म्हणून देण्यात आलेल्या हारामध्ये जगभरातील सर्वात महागडे हिरे आहेत.
लेबेंन्स ज्वेलर्सने बनवलेल्या या ‘L’Incomparable नेकलेसची किंमत ३०० कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर या हाराची तुफान चर्चा होत आहे. नीता अंबानी यांच्याशिवाय श्लोकाची नणंद म्हणजेच इशा अंबानीने भाऊ आणि वहिनीला एक आलिशान बंगला भेट म्हणून दिला.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा भव्यदिव्य लग्नसोहळयाला उद्योग, राजकीय, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. करण जोहर, शाहरुख खान, रणबीर कपूर, यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी ठुमके लगावले.
