Anna-Hajare-FB-PP-WEB
अहमदनगर: राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारने स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी आणि लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत.
आता सत्तेत असलेलं सरकार खोटारडं आहे. माझ्या 90 टक्के मागण्या मान्य झाल्याच नाहीत तरी सुद्धा राज्य सरकार माझ्या 90 टक्के मागण्या पूर्ण झाल्याचे सांगत आहे. मागण्या मान्य होऊन सुद्धा उपोषणाला बसायला मी वेडा आहे का? मोदी सरकार माझा अजिबात विश्वास राहिलेला नाही.
