google doodle
आज सर्वत्र भारतात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने गुगलनेही खास डुडलद्वारे मानवंदना दिली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले. त्यानिमत्ताने 26 जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ देशभर साजरा केला जातो. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता.
