धक्कादायक! पालघरमधील २४ जणांचे विलगीकरणातून पलायन
पालघर जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून विलगीकरण केलेल्या २४ जणांनी पलायन केल्याची माहिती आकाशवाणी ने आपल्या वार्ताहराच्या हवाल्याने दिली आहे. कासा इथल्या उपजिल्हा रूग्णालयातल्या दोन डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेले डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी आणि उपचार घेत असलेले रुग्ण असे एकूण १८७ जण विलगीकरण केले होते. त्यांपैकी २४ जणांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केलं असल्याच आकाशवाणी ने वृत्त प्रसारित केलं आहे.
क्रेडिट – AIR
