आम्ही खोटी वचनं देणार नाही, लोकांच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार!- राहुल गांधी
कानपुर: कानपूर येथील एका प्रचारसभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे खोटे आश्वासन दिले होते.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आल्यावर, आम्ही मोदींसारखी खोटी वाचन तुम्हाला देणार नाही, तुमच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार, फसवणार नाही अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
आधीचे १०० दिवसांचे मनरेगा आता १५० दिवसांचे करण्यात येईल. मनरेगाचा पैसा मिळेल त्याची किंमत १२ हजार असेल तर ‘न्याय’ योजनेचाही लाभ मिळेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. आमचे सरकार ‘न्याय’ योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये टाकणार. दर महिन्याला तुमच्या खात्यात १२ हजार रुपये टाकणार असे राहुल गांधी म्हणाले.
