बिग बी साकारणार तृतीयपंथीय महिलेची भूमिका
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या दाक्षिणात्य हॉरर कॉमेडी ‘कंचना’ च्या हिंदी रिमेक चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन चाहत्यांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय आणि अमिताभ दोघेजण एकत्र काम करणार आहेत. खासकरून या चित्रपटात अमिताभ तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार आहेत.
कंचना या चित्रपटात अमिताभ कंचनाची मूख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील ‘कंचना’ नावाची महिला आपल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आलेली असते. यासाठी कांचना राघव नावाच्या माणसाच्या शरीरात वास करत असते.
सध्या कंचना या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अक्षय बिझी असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाची कहाणी थोडी हटके आहे. तसेच या स्क्रिप्टमध्ये थोडासा फरक केलेला आहे. तसेच अक्षय धाडसी व्यक्तीची भूमिका साकारत आहे.
