कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
मुंबई: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळासाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे.’ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे मोदींच्या बाजूने बोलत होते याची आठवण आठवलेंनी आपल्या भाषणातून करुन दिली. गुजरात मधील मोदींची विकासकामे पाहण्यासाठी राज यांनी आठ दिवसांचा दौरा केला होता. हे सर्व ते विसरले का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात देशात आधीच ५६ विरोधक एकत्र आले असून त्यात आता ५७ व्या नंबरवर राज ठाकरे आले आहेत पण त्याचा काही फरक आम्हाला पडणार नाही’ असे आठवले म्हणाले. राज ठाकरेंकडे सभेला गर्दी करण्याची ताकद आहे पण उमेदवार निवडूण आणण्याची ताकद आमच्याकडे असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.
आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी कविता करत राज यांच्यावर टीका केली आहे.
“राष्ट्रवादी – काँग्रेस सोबत गेले आहेत राज…
म्हणुनच इथे आलो आहे मी आज..
कारण मला जिरवायचा आहे महाआघाडीचा माज…”
कालच मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमधील कामोठे घेण्यात आलेल्या प्रचारसभेमध्येही आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून टिका केली.
“नका मारु विनाकारण बढाई
नरेंद्र मोदींच जिंकणार आहेत २०१९ ची लढाई”
