ओमिक्रॉन विषाणूची तीव्रता कमी असली तरीही त्याला सौम्य विषाणू समजू नये – जागतिक आरोग्य संघटना
कोविड 19 विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार अधिक वेगाने पसरत जाणारा असून त्याच्यामुळे उद्भवणाऱ्या आजाराची लक्षणं डेल्टा प्रकारामुळे होणाऱ्या आजाराच्या लक्षणांपेक्षा सौम्य असली तरी एकूणात या विषाणूला सौम्य मानण्याची चूक करुन चालणार नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी जेनेट डायझ यांनी काल जीनीव्हा येथे पत्रकार परिषदेत सांगितलं की लक्षणं सौम्य असल्याचं आणि लहानथोरांना धोका कमी असल्याचं प्राथमिक पाहणीत आढळलं असलं तरी आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. संघटनेचे महासंचालक टेडरॉस घेबरेसस यांनीही त्याला दुजोरा दिला. येत्या जुलै पर्यंत जगातल्या ७० टक्के लोकसंख्येला लस मिळाली पाहिजे असं उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलं असून सर्वच देशातल्या सरकारांनी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे. लहान राष्ट्रांनी एकावर एक वर्धक मात्रा देऊन हे उद्दिष्ट साध्य होणार नाही असं ते म्हणाले.
Source-AIR
