तामिळनाडूमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले ‘आयएएफ’चे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन
तामिळनाडूमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या ८ तारखेला ही दुर्घटना घडली होती. त्यांच्यावर बंगळुरुतल्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमान आणि शौर्यानं देशाची सेवा केली, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. याच अपघातात देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन कुमार रावत यांचे निधन झाले.
