“वर्ष २०२०-२१ साठी शुल्कवाढ करू नये अन्यथा कारवाई होईल”- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शिक्षणसंस्थांना आदेश
मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावणाऱ्या संस्थाचालकांना एका नव्या आदेशान्वये दणका दिला आहे. सध्या लॉकडाऊन मुळे राज्यातील नागरिकांची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्याची येत्या शैक्षणिक वर्षाचे शाळेचे वार्षिक शुल्क भरणे शक्य होत नाहीये. या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी एप्रिल महिन्यात सर्व शिक्षणसंस्थांना पालकांना शालेय शुल्क पुढील ३ महिने भरण्याचा तगादा लावू नये अशी सूचना केली होती. पण तरीही काही संस्थाचालक व व्यवस्थापन पालकांना शुल्क भरण्याबाबत दबाव टाकत होते.
यासंदर्भातील तक्रारी आल्यावर शिक्षणमंत्र्यांनी थेट शासन निर्णय काढत सर्व शिक्षणसंस्थांना व त्यांच्या व्यवस्थापनाला २०२०-२०२१ साठी शुल्कवाढ करू नये अथवा कारवाई होईल तसेच लॉकडाऊन उठल्यावर मागील वर्षातील बाकी राहिलेली व चालू वर्षातील मासिक फी एकदाच न घेता मासिक अथवा त्रैमासिक घ्यावी असे आदेश दिले आहेत.
याच सोबत यात शासन निर्णयात त्यांनी पालकांच्या कार्यकारी समिती म्हणजेच (EPTA) यांनाही काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व त्याबाबत खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये(EPTA) ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात शुल्क कमी करावे असेही PTA सदस्यांना सांगितले आहे.
शासन निर्माण


