एका औषध निर्मिती कंपनीच्या वक्तव्यावर व्यक्त केला खेद
वर्षअखेरपर्यंत कोविड-१९ ची बूस्टर मात्रा देऊ नका असं आवाहन कोरोना प्रतिबंधक लसींचा मोठा पुरवठा असलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केलं आहे. जिनिव्हा इथल्या मुख्यालयातून आवाहन करताना महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रयेसू यांनी सांगितलं की बूस्टरपेक्षा गरीब राष्ट्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि असुरक्षित लोकसंख्येला पहिली मात्रा मिळवण्यास प्राधान्य आणि मदत द्या आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या निरोगी लोकांसाठी बूस्टरचा व्यापक वापर टाळावं.
लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहे जेणेकरून श्रीमंत देशांतील लोकांसाठी बूस्टर मात्रा आणि गरीब देशांमधील लोकांना प्रथम मात्रा दोन्ही मिळू शकतील अशा एका औषध निर्मिती कंपनीच्या वक्तव्यावर त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला. लसींच्या जागतिक पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या कंपन्या आणि देशांना जर वाटत असेल की गरीबांनी शिल्लक राहिलेल्या गोष्टींवर समाधान मानावं तर ते आम्ही खपवून घेणार नाही असे खडे बोल घेब्रयेसूस यांनी यावेळी सुनावले.
Source – AIR
