केंद्राकडून कोरोना प्रतिबंधक दोन लसी आणि एका औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संस्थेनं कोर्बेवॅक्स, कोवोवॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसींना आणि मोलनु पिरावीर या प्रादुर्भाव प्रतिबंधक गोळीला आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.
Congratulations India 🇮🇳
Further strengthening the fight against COVID-19, CDSCO, @MoHFW_INDIA has given 3 approvals in a single day for:
– CORBEVAX vaccine
– COVOVAX vaccine
– Anti-viral drug MolnupiravirFor restricted use in emergency situation. (1/5)
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) December 28, 2021
हैदराबाद इथल्या बायोलॉजिकल- ई या कंपनीनं बनवलेली कोर्बोवॅक्स ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस आहे.भारतात बनवलेली ही तीसरी लस आहे, असंही या संदेशात मांडवीया यांनी म्हटलं आहे. कोवोवॅक्सचं उत्पादन पुण्यातली सीरम इन्स्टिट्युट करणार आहे. मोलनु पिरावीर या गोळीची निर्मिती देशातल्या १३ कंपन्या करणार असून वयस्कर रुग्णांसाठी तिचा उपयोग केला जाईल.
