पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ने बनवली सर्व्हायकल कॅन्सरवरची स्वदेशी लस
पुणे, दि. १ : देशात तयार करण्यात आलेल्या पहिल्या सर्व्हायकल कॅन्सरवरच्या लशीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केली. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली ही HPV लस सर्वसामान्य भारतीय नागरिकाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, असं ते म्हणाले.
महिलांच्या आरोग्यावर आता लक्ष केंद्रीत केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. सरकारी आणि खासगी क्षेत्रानं एकत्रितरित्या काम केलं देश स्वयंपूर्ण होऊ शकतो, असं ते म्हणाले.
