उरण येथील विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न
उरण,दि. २४(विठ्ठल ममताबादे): २३ डिसेंबर रोजी विजय विकास सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स कराटे अकॅडमी कराटे इन्स्ट्रक्टर असोशियन VVSS तर्फे कराटे बेल्ट एक्झाम घेण्यात आली. त्यामध्ये साठ मुलांनी सहभाग घेतला. चार तास सतत परीक्षा घेतल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र व बेल्ट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर तसेच जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, कामगार नेते महादेव घरत तसेच ज्यांच्या अंतर्गत बेल्ट परीक्षा घेण्यात आली असे दीपक घरत, विकास भोईर, दर्शन घरत, प्रगती भोईर, विशाल डाके, प्रकाश घरत, सागर कडू, मच्छिंद्र घरत, अजय तांडेल असे वरिष्ठ मान्यवर ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यासाठी आवर्जून हजर होते. माजी आमदार मनोहर भोईर यांनी मुलांशी संवाद साधताना कराटे कशासाठी आत्मसात केलं पाहिजे व भविष्यामध्ये आपल्या स्वतःवर अन्याय होऊ नये व गावोगावी याचा प्रसार-प्रचार करावा असे नमूद करून त्यासाठी लागणारी भरीव मदत करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले. सदर बेल्ट परीक्षा नवीन शेवा गावांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेला स्पर्धक व जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.

