केंद्र सरकारकडून टोमॅटो फ्लू आजारांसंबंधी मार्गदर्शक सूचना निर्गमित
नवी दिल्ली, दि. २४ : केंद्र सरकारनं हात, पाय आणि मुख रोग अर्थात टोमॅटो फ्लू या आजारांसंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीला केरळमध्ये या आजाराचा पहिला रुग्ण आढळला आणि २६ जुलैपर्यंत ५ वर्षांखालील ८२ बालकांना याची लागण झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. ओडिशामधल्या २६ बालकांनाही या आजाराची लागण झाल्याचं तिथल्या क्षेत्रिय वैद्यकीय संशोधन केंद्रानं म्हटलं आहे. ताप, त्वचेवर पुरळ येणे आणि घशाला सूज येणे ही या आजाराची लक्षणं असून सुरुवातीला ताप, थकवा आणि भूक मंदावणं ही लक्षणं जाणवतात.
