संरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीची तेजस मार्क-२ प्रकल्पाला मंजुरी
तेजस मार्क-२ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. या लढाऊ विमानाच्या आराखड्यासाठी आणि ते बनवण्यासाठी प्रोटोटाईप, उड्डाणाची चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी समितीने ६ हजार ५०० कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला मिळालेल्या विद्यमान २५०० कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त या अधिक रकमेची मंजुरी मिळाली आहे. याप्रगत विमानाच्या उड्डाणात आणि लढाऊ क्षमतांमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.
तेजस मार्क-२ या लढाऊ विमानांमुळे स्वदेशी रचना आणि विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल वी. आर. चौधरी यांनी सांगितलं.
