शिवसेना अधिकृत ठाकरे गट बंडखोर शिंदे गटाने दाखल केलेल्या विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली, दि. ३: १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
शिंदे सरकारच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका, तसंच शिंदे गटातल्या आमदारांना ठाकरे गटानं अपात्र ठरवणं, त्याचवेळी आपलाच गट अधिकृत असल्याबद्दल शिंदे गटानं दाखल केलेली याचिका या सर्वांवर एकत्रित सुनावणी होणार आहे.
