शिवभोजन थाळी सारखंच पश्चिम बंगालमध्ये ५ रुपयात माँ नावाने भोजन थाळी योजनेचे ममता बॅनर्जी यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्रात ठाकरे सरकारने जशी शिवभोजन थाळी सुरू केली त्याच धर्तीवर पश्चिम बंगाल सरकारने गरिबांसाठी अवघ्या ५ रुपयात माँ नावाने भोजन थाळी सुरु केली आहे. यामध्ये भात, डाळ, भाजी आणि अंडाकरी यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते काल या योजनेच उद्घाटन झाले. राज्यसरकार या थाळी साठी प्रत्येकी १५ रुपयांचं अनुदान देणार असून, स्थानिक स्वयंसहायता गटांमार्फत त्याची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिली.
दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत हि भोजन थाळी गरजूंना उपलब्ध होईल आणि या उपक्रमाच राज्यभर टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येईल असही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेच्या वचननाम्यात उल्लेख केलेल्या शिवभोजन थाळीच्या योजनेला सुरुवात करण्यात आली. ही योजना अगदी लॉकडाऊन काळातही जोमात चालू होती. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तशाच स्वरूपात आपल्याही राज्यात गरिबांना जेवण देण्याची योजना सुरू केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
