जाणून घ्या कोणत्या देशांतून येणार्या विमान प्रवाशांची होणार आरटीपीसीआर चाचणी
मुंबई, दि. २४: जगातील काही देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून चीन, जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकाँग, बँकॉक या ठिकाणांवरून येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी चर्चा करून तात्काळ ही चाचणी अनिवार्य करण्यात येईल. भारतात आल्यानंतर कोणालाही तापासारखी कोविडची लक्षणं आढळ्यास किंवा आरटीपीसार चाचणीचा अहवाल सकारात्मक आला तर त्या रुग्णाला तत्काळ विलगीकरणात पाठवण्याचे आदेश आरोग्य मंत्रालय जारी करत आहे, असं मांडवीय यांनी सांगितलं.
