“देशाच्या शस्त्रास्त्रांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य” – राजनाथ सिंग
भारतीय लष्कराचं एक क्षेपणास्त्र अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत डागलं गेल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. भारतीय सेनादलं प्रशिक्षित, अनुभवी आणि शिस्तबद्ध असून देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे असं ते म्हणाले. क्षेपणास्त्र अनवधानाने डागलं गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करुन सिंग म्हणाले की या घटनेत काहीही नुकसान झालं नाही. तथापि सरकारने हा अपघात गांभिर्याने घेतला असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकशीनंतर सत्य बाहेर येईल असं त्यानी स्पष्ट केलं. या घटनेच्या अनुषंगाने देखभाल दुरुस्ती नियमित तपासणी इत्यादी प्रक्रीयांचा आढावाही घेण्यात येत आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास तिथल्यातिथे दुरुस्त करण्यात येईल असं ते म्हणाले.
