‘ही’ गोळी घेतल्यावर कोविड मृत्यूच प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत खाली येत असल्याचा अमेरिकेच्या ‘फायझर’ कंपनीचा दावा
कोविड प्रतिबंधात्मक गोळीमुळे मृत्युचं प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा दावा अमेरिकेच्या ‘फायझर’ या औषध निर्माण कंपनीने केला आहे. काल कंपनीने या संदर्भातलं अधिकृत पत्रक जाहिर केलं.
‘पॅक्सलोविड’ असं या गोळीचं नाव असून अधिक धोका असलेल्या लोकांमध्ये लक्षणं दिसू लागल्यानंतर लगेच वापरण्यासाठी आहे. आपत्कालीन वापरासाठी या औषधाचा अंतिम चाचणी निकाल औषध नियमकाकडे लवकरच पाठवण्यात येणार असल्याचं कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी सांगितलं.
