पद्म पुरस्कार-२०२२ साठी नामांकन पाठवण्याचा आजचा शेवटचा दिवस
नवी दिल्ली, दि.१५: २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार ( पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री) साठी ऑनलाईन नामांकन/शिफारसी पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन/ शिफारसी https://padmaawards.gov.in या पद्म पुरस्कार पोर्टलवर केवळ ऑनलाईन स्वीकारल्या जातील.
पद्म पुरस्कार ‘जनतेचे पद्म’ पुरस्कार म्हणून परिवर्तीत करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. विविध क्षेत्रातील गुणवान आणि उत्कृष्ट कार्य करणारे मान्यवर प्रामुख्याने महिला, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती जे निःस्वार्थ वृत्तीने समाजाची सेवा करत आहेत अशा व्यक्तींसाठी नामांकने / शिफारस पाठवण्याची विनंती सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
या नामांकने/ शिफारसीत, पद्म पोर्टलवर दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात संपूर्ण सविस्तर माहिती भरुन पाठवायची आहे. याबरोबरच संबंधित व्यक्तीच्या, त्या क्षेत्रातल्या असामान्य कार्य/सेवा याविषयीची माहिती (जास्तीत जास्त ८०० शब्दांत) भरुन पाठवायची आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (www.mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके (‘Awards and Medals’) शीर्षकाखाली उपलब्ध आहे. या पुरस्कारांची सद्यस्थिती आणि नियमावली, https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहिती/ सहाय्यासाठी 011-23092421, +91 9971376539, +91 9968276366, +91 9711662129, +91 7827785786या क्रमांकावर संपर्क करा.
