नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचा ऐतिहासिक निर्णय
नवी मुंबई, दि. ९: नवी मुंबईचा नावलौकिक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर होत असताना नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवासुविधा गुणवत्तापूर्ण असण्याकडे विशेष दिले जात आहे. याकामी कार्यरत असणा-या महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींकडे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून कर्मचारीहिताचे विविध निर्णय घेतले जात आहेत.
या अनुषंगाने दि. ७ जुलै रोजी विविध विभागातील तब्बल १५० अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नतीनंतर त्यांना पदस्थापना देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विभागांच्या कार्यप्रणालीमध्ये सूसुत्रता येण्याच्या दृष्टीने अनेक वर्ष एका विभागात कार्यरत असलेल्या १५९ अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे तब्बल ३०९ अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यापक स्वरूपातील बदलीचा व पदस्थापनेचा हा महत्वापूर्ण निर्णय महानगरपालिकेच्या कामकाजाला गतीमानता देणारा आहे.
यामध्ये पदोन्नतीस पात्र ६ सहा. आयुक्त, १५ प्रशाकिय अधिकारी, ३० अधिक्षक/वसूली अधिकारी, ९१ वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक, १ लेखाधिकारी, ७ सहा. लेखाधिकारी अशा १५० इतक्या मोठ्या संख्येने कर्मचा-यांना पदोन्नतीनंतरची पदस्थापना देण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे बरीच वर्ष एका विभागात काम करणा-या १५९ इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ५ लेखाधिकारी, ७ सहा. लेखाधिकारी, १४ उपलेखापाल, १ सहा. आयुक्त, ३ प्रशासकिय अधिकारी, ३ अधिक्षक/वसूली अधिकारी, २५ वरिष्ठ लिपिक/कर निरीक्षक, आणि १०१ लिपिक अशा १५९ कर्मचा-यांची बदलीने पदस्थापना करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात विविध संवर्गातील २४ कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आज १५९ जणांची बदलीने पदस्थापना करण्यात आलेली असून एकूण १८३ जणांच्या बदल्या झालेल्या आहेत. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कर्मचारीहिताय निर्णयाचा सकारात्मक परिणाम महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर होणार असून यामुळे नागरी सुविधा परिपूर्ती कार्याला अधिक गतीमानता प्राप्त होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलेला आहे.
