केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या कर्नाटक येथे ११,००० कोटी रुपयांच्या ३३ महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
नवी दिल्ली/कर्नाटक: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या कर्नाटक इथे ३३ महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा या आभासी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. तसेच, केंद्रीय मंत्री व्ही के सिंग, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होतील.
या सर्व प्रकल्पांअंतर्गत सुमारे १२०० किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम केले जाणार आहे. काही प्रकल्पांचे उद्घाटन तर काही प्रकल्पांचे भूमिपूजन होणार असून, या संपूर्ण प्रकल्पांसाठी ११,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमुळे कर्नाटकातील रस्ते वाहतूक उत्तम होणार असून त्यातून कर्नाटकच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
