भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
नवी दिल्ली: भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी येत्या दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर व्हावं, असे निर्देश सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या पीठानं दिले आहेत.
ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि सिद्धार्थ लुथरा यांनी राणे यांची बाजू मांडली तर अॅडव्होकेट डॉक्टर अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारतर्फे युक्तिवाद केला.
