संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला आहे. हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सुधारित तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबतचं विधेयक, कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आज संसदेसमोर मांडणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं होतं.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसद भवनात सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, तसंच द्रमुक, वायएसआर काँग्रेस, लोकजन शक्ती पक्ष, अपना दल या पक्षांचे नेते, या बैठकीला उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षासह काँग्रेसनं आपापल्या लोकसभा सदस्यांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप अर्थात पक्षादेश जारी केला आहे.
Source-AIR
