खारघर मधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विधी महाविद्यालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला लाभला उत्तम प्रतिसाद
नवी मुंबई, दि. १५ : खारघर मधील गोखले एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या ऍड. श्रुती जाधव यांच्या मार्गर्शनाखाली “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत काल दिनांक १४ ऑगस्ट, २०२२ रोजी महाविद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी व स्थानिक रहिवाशांनी सामाजिक बांधिलकी जपत खूप मोठ्या संख्येने रक्तदान केले. यावेळी एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर यांच्या माध्यमातून करण्यात आले. याचसोबत सदर उपक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित नागरिकांना राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यात आले व प्राचार्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वजाचा मान राखण्याबाबत सूचना देखील देण्यात आल्या.

सदर रक्तदान शिबिरात यु. टी. पवार, अधीक्षक-तळोजा सेंट्रल जेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचसोबत झुटळे साहेब, अधिकारी-तळोजा सेंट्रल जेल, विठ्ठल डाके, उपायुक्त-पनवेल महानगरपालिका, टाटा मेमोरियल सेंटर रक्तपेढी तर्फे अभिताब रावताळे, सहाय्यक वैद्यकीय समाजसेवक, माजी विद्यार्थी कुणाल जाधव, सोनाली कुळये, प्रतिभा खरात, ऋतुजा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यास प्रा. नित्या राधाकृष्णन, प्रा. ऍड. अविनाश पाटील, विशाल बामणे, कुमारी. शिवानी ढिचोळकर, सुरेख पालकर, कल्पेश चव्हाण (विद्यार्थी), रजनीश शिंदे (विद्यार्थी), लक्ष्मीकांत व्यास (विद्यार्थी), सतीश पाटाडे (विद्यार्थी) आदींनी अधिक मेहनत घेतली.

