जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून भारताच्या पर्यावरण रक्षणासाठी च्या प्रयत्नांबाबत प्रतिपादन
प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की, निर्धारित कालावधीपेक्षा पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचं उद्दिष्ट्य भारतानं साध्य केलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी पुढे सांगितलं की, विकसित झालेल्या पाश्चिमात्य देशांनी पृथ्वीवरील मृदा संपत्तीचं सर्वाधिक शोषण केलं आहे, इतकंच नाही तर सर्वाधिक कार्बन उत्सर्जनालाही ते जबाबदार आहेत.
स्वच्छ भारत अभियान, नमामि गंगे आणि एक सूर्य एक ग्रीड अशा विविध पर्यावरण रक्षण करणारे विविध उपक्रम भारतात राबवले जात असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, याआधी शेतकऱ्यांमध्ये मातीच्या गुणवत्तेबाबत जागरूकता नव्हती. त्यांच्या जागरूकता निर्माम करण्यासाठी व्यापक अभियान चालवण्यात आले आणि त्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड देण्यात आलं. आतापर्यंत २२ कोटींहून अधिक मृदा स्वास्थ्य कार्ड शेतकऱ्यांना दिली आहेत.
