चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत सहा जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत
मुंबई, दि. २० : मराठा आरक्षणाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती, तसंच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करणार आहे.
