‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर
पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल मिलिंद नारायणराव भुरके यांना या पुरस्कारातील अतिविशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले असून त्यासाठी २ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सुभेदार मच्छिंद्रनाथ गोविंदा पाटील यांना मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्यपदक बहाल करण्यात आले असून याकरिता ६ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुभेदार संभाजी गोविंद भोगण यांनाही मेन्शन इन डिस्पॅच हे शौर्यपदक बहाल करण्यात आले असून याकरिता ६ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतून अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम ही शासकीय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सुभेदार सुनिल नामदेव पाटील यांना सेना पदक बहाल करण्यात आले असून याकरिता ५ लाख ५० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या शासकीय अनुदानापैकी ७५ टक्के रक्कम शासकीय अनुदानातून तर उर्वरित २५ टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव यांनी १० मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध केला आहे.
