राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांशी संबंधीत विविध ठिकाणांवर सीबीआयचे छापे
पटना, दि.२०: रेल्वे नोकरी-जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवी, कन्या आणि राज्य सभेच्या खासदार मीसा भारती आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत विविध ठिकाणांवर सीबीआय छापे टाकत आहे.
ही छापेमारी पटणा, गोपालगंज आणि दिल्ली या ठिकाणांवर करण्यात येत आहे. आज सकाळी सीबीआयच्या एका पथकानं राबडी देवी यांच्या पटना इथल्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी केली. सीबीआयने लालू प्रसादांविरूद्ध रेल्वे नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनी लादल्याच्या नवीन प्रकरणाची नोंद केली आहे.
