अभिनेत्री केतकी चितळे व निखिल भामरे विरोधातील सर्व एफआयआर एकत्र करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
मुंबई, दि. २३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात राज्यभरात दाखल झालेले सर्व २२ एफआयआर एकत्रित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तसंच याच प्रकरणी विद्यार्थी निखिल भामरेच्या विरुद्ध दाखल सहा एफआयआर देखील एकत्रित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, हे सर्व एफआयआर बेकायदेशीर असून दाखल याचिका रद्द कराव्यात किंवा ते सगळे एकत्र करून एकाच ठिकाणी त्याची सुनावणी करावी, अशी विनंती या दोन कथित आरोपींनी केली होती, त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती नितिन जामदार आणि एन. आर. बोरकर यांनी हा आदेश दिला.
