केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटप योजनेचा कालावधी मार्च २०२२ पर्यंत वाढवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली, दि.२४: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत लाभार्थी व्यक्तींना केंद्रसरकारतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्रत्येकी पाच किलो अन्न धान्य मोफत पुरवलं जातं. कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा फटका बसलेल्या नागरिकांना अन्न सुरक्षा देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत देशातल्या ८० कोटी लाभार्थीना अतिरिक्त अन्न धान्य मोफत पुरवणार असल्याचं केंद्रसरकारनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात जाहीर केलं होतं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी केंद्रसरकार अंदाजे २ लाख ६० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेचा कालावधी पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत वाढवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती.
Source – AIR
