झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सादर केला विश्वास दर्शक ठराव
रांची, दि. ५ : झारखंड विधान सभेच्या आजच्या विशेष सत्रात हेमंत सोरेन यांच्या आघाडी सरकारने विश्वास दर्शक ठराव सादर केला असून, त्यावर चर्चा सुरु आहे. यात सहभागी होण्यासाठी काल भाजप प्रणित आघाडी सरकारचे २ मंत्री आणि २९ आमदार रायपूरमधून रांचीला पोचले होते. हे सर्वजण सर्किट हाऊसमध्ये कडक सुरक्षेत राहत होते. राज्यपाल रमेश बैस देखील नवी दिल्लीहून रांचीला परतले होते. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे काँग्रेसचे २ आमदार या विशेष सत्रात सहभागी होऊ शकले नाहीत.
