या जिल्ह्यातील ३,८४० जणांना गत ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न केल्याने निवडणूक लढवण्यास बंदी
सोलापूर : २०१५ साली ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या मात्र निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ८४० जणांना यंदाची निवडणूक लढवता येणार नसल्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
या संदर्भातील यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज छाननीच्या वेळी या यादीत नाव आहे की नाही याची खात्री करुनच अर्जाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.
