जगभरात गुड फ्राय डे निमित्त विशेष प्रार्थना सभांचं आयोजन
आज गुड फ्रायडे आहे.येशू ख्रिस्तांना सुळावर चढवल्याच्या स्मृतीनिमित्त हा दिवस पाळला जातो. याच दिवशी ख्रिस्तांनी सर्व जगावरच्या प्रेमाखातर आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं होतं.
या दिवशी ख्रिश्चन धर्मीय प्रभू येशूचं स्मरण करत शांततेसाठी प्रार्थना करतात. जगभरात गुड फ्राय डे निमित्त विशेष प्रार्थना सभांचं आयोजन केलं जात आहे. देशभरातही आज ख्रिस्त धर्मीयांच्या वतीनं प्रभू येशूचं स्मरण केलं जात आहे.
गोव्यात गुड फ्राइडे निमित्त विविध चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं असून यात अनेकजण श्रद्धा आणि भक्तिभावानं सहभागी होत आहेत.
