गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद सांवत यांचा शपथविधी पंतप्रधानांच्या उपस्थितीत संपन्न
पणजी, दि.२८: गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद सांवत यांनी आज दुसऱ्यांदा शपथग्रहण केली. पणजीजवळ श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानावर झालेल्या या शपथविधी समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसंच भाजपाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी इतर आठ कॅबिनेट मंत्र्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. त्यात विश्वजीत राणे, मौवीन गोडिन्हो, रवी नाईक, निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खौंटे, गोविंद गावडे, अॅटानासिओ मोनसेरेट यांचा समावेश आहे. गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपानं ४० पैकी २० जागा जिंकल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना तीन अपक्ष, तसंच महाराष्ट्रवादी गोमान्तक पक्षाच्या दोन आमदारांनी पाठींबा दिला आहे.
