चार वर्षांकरिता रु. १८,६५०/- ची भरघोस पगारवाढ
उरण, दि. १(विठ्ठल ममताबादे): उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोहर भोईर यांच्या सततचा पाठपुरावा, योग्य मध्यस्थी तसेच मार्गदर्शनामुळे जी.टी.आय. पोर्ट आस्थापनेतील महेश इंटरप्रायजेस आर.टी.जी. मेंटेनन्स शिवतेज कामगार संघटनेचे सभासाद/कामगार (आर.टी.जी. मेंटेनन्स) यांना भरघोस पगार वाढीचा (रु.१८६५०/- चार वर्षाकरिता) करारनामा करण्यात आला.
करारामधील प्रमुख मुद्दे:
१. रु.१८६५०/- चार वर्षाकरिता
२. २.५० लाख + बफर मेडिकल पॉलीसी,
३. ३० लाख रुपयांची मरणोत्तर कुटुंबियांसाठी पॉलिसी
४. ८.३३% बोनस +२०,००० एक्सग्रेसिया(अतिरिक्त)
५. इंसेंटिव्ह मध्ये १०% वाढ
६. सरकारी नियमाप्रमाणे सुट्ट्या, कॅजुअल लिव्ह, सिक लिव्ह, पेड लिव्ह मध्ये वाढ
७. घरातील व्यक्तीच्या मृत्यू नंतर रजा आणि पितृत्व रजा मंजूर
८. सदर करार हा एप्रिल २०२० ते मार्च २०२४ पर्यंत लागू आहे
९. आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या पाठपुराव्याने कोरोना काळात काम केलेल्या प्रत्येक कामगारांना प्रत्येकी ५५,००० रुपये मंजूर.
सदर करारावेळी माजी आमदार तथा शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोहर भोईर, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा कामगार नेते महादेव घरत, शिवतेज कामगार संघटनेचे सचिव तथा कामगार नेते महेंद्र सावंत, महेश इंटरप्रायजेसचे नरेंद्र कावले, राजेंद्र पडते शिवतेज कामगार संघटनेचे, युनिट प्रतिक दर्णे, अमित म्हात्रे, संतोष भोपी, जयंत पाटील, अजय सुतार जगदिश भोईर उपस्थित होते.
यावेळी कामगार वर्गातून माजी आमदार मनोहर भोईर यांचे कौतुक करण्यात आले. तसेच शिवतेज कामगार संघटना व कामगार वर्ग कडून जि.टी.आय. व महेश इंटरप्रायजेस व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
