पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ(FCI) आघाडीवर
पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ आघाडीवर असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
मुंबईत पत्रकारांना माहिती देताना के. पी. आशा, महाव्यवस्थापक, एफसीआय, महाराष्ट्र यांनी सांगितले, की मे – जून २०२१ दरम्यान ३ लाख ६८ हजार मेट्रिक टन गहू आणि २ लाख ५७ हजार मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रासाठी ७ लाख मेट्रिक टन धान्य देण्यात आले होते.
