DCIM100MEDIADJI_0189.JPG
नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम मध्ये रंगणार महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतला दुसरा सामना
नवी मुंबई, दि. १२ : देशात प्रथमच होत असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी नवी मुंबई हे यजमान शहरांपैकी एक आहे. स्पर्धेतला दुसरा सामना आज नेरूळच्या डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये संध्याकाळी साडेचार वाजता मेक्सिको आणि चीन या संघांमध्ये होईल. स्पेन आणि कोलंबिया यांच्यातला सामनाही आजच रंगणार आहे. या स्पर्धेत १६ संघामध्ये ३२ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामनाही याच मैदानावर ३० ऑक्टोबरला होईल. स्पर्धेचं उद्घाटन ओदिशात भुवनेश्वर इथल्या कलिंग स्टेडीयमवर झालं. तिथे आणि गोव्यात मडगावच्या जवाहरलाल नेहरु स्टेडीयमवर स्पर्धेतले सामने होणार आहेत.
