१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धेला आजपासून भुवनेश्वर येथे प्रारंभ
भुवनेश्वर, दि. ११ : सतरा वर्षाखालील फिफा महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेला आजपासून भुवनेश्वर इथं सुरूवात होत आहे. भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे. स्पर्धेत सहभागी असलेले सोळा संघ प्रत्येकी चार संघांच्या चार गटात विभागले गेले आहेत. या स्पर्धेतला अ गटातला सलामीचा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात आज संध्याकाळी भुवनेश्वरच्या कलिंगा मैदानावर खेळला जाणार आहे. रात्री ८ वाजता सामना सुरू होईल. दरम्यान फिफा विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद मिळणं हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
