FCRA अंतर्गत नोंदणीकृत संस्थांच्या काही श्रेणींच्या नोंदणी प्रमाणपत्रांची वैधता वाढवण्याचा निर्णय
विदेशी योगदान नियमन कायदा, FCRA अंतर्गत नोंदणीकृत संस्थांच्या काही श्रेणींच्या नोंदणी प्रमाणपत्रांची वैधता वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ज्या संस्थांच्या नोंदणी प्रमाणपत्रांची वैधता या महिन्याच्या ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आली होती आणि ज्यांचे नूतनीकरण अर्ज प्रलंबित आहेत अशा संस्थांना या वर्षापर्यंत किंवा नूतनीकरण अर्ज निकाली काढण्याच्या तारखेपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्या मुदतीपर्यंत वैधता वाढवली जाईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. ज्या FCRA संस्थांची वैधता १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२२ दरम्यान संपत आहे आणि ज्यांनी ५ वर्षांचा वैधता कालावधी संपण्यापूर्वी नूतनीकरणासाठी अर्ज केला आहे त्यांची वैधता ३० जून २०२२ पर्यंत किंवा निकालाच्या तारखेपर्यंत वाढवली जाईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
Source-AIR
